11th admission: अकरावी ऑनलाईन प्रवेशाची यादी जाहीर; एक लाख विद्यार्थी प्रवेशापासून दूरच

11th admission
11th admissionesakal

मुंबई: मुंबईसह राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात आली.

या यादीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार देण्यात आलेल्या महाविद्यालयांसह शाखा आदींची माहिती त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आज जाहीर झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी भाग-१ भरून पूर्ण केला आहे, त्यांचा समावेश आहे. यात राज्यात एकूण तीन लाख ६२ हजार ८९० जणांचा समावेश आहे.

यामध्ये मुंबईतील दोन लाख ४० हजार ३०१ आणि पुण्यातील ७४ हजार १० विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.

11th admission
Police Force : नामकरण ते निवृत्ती.. 'या' श्‍वानांचा पोलिस दलात वेगळाच थाट; डायट, दिनचर्या आणि बरंच काही..

आज जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या सुधारणा यादीत काही सुधारणा असल्यास पुढील दोन दिवसांत पहिली गुणवत्ता यादी ही १९ जून रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.

राज्यातील पाच महापालिकाक्षेत्रात असलेल्या एक हजार ६६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी पाच लाख ८८ हजार १६५ जागा उपलब्ध आहेत.

त्यासाठी आज सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी चार लाख ११ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यातील तीन लाख ६३ हजार १६८ जणांचे अर्ज लॉक झाले असून उर्वरित तब्बल एक लाख ७६ हजार ८२९ जणांचे अर्ज अर्धवट राहिले आहेत.

त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय होणार असा सवाल केला जात आहे. तर आज जाहीर झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे आली आहेत, त्यांचे अर्जच अर्धवट राहिलेल्या एक लाख ७६ हजार ८२९ जणांचा सर्वसाधारण यादीत कधी समावेश केला जाईल असेही सवाल केले जात आहेत.

11th admission
Nagpur: पाकिस्तानी ‘टॉक शो’मध्ये नागपूरचे गुणगान; खबरनाक कार्यक्रमात तर्री पोहा, मेट्रोचा उल्लेख

विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल

सध्या व्‍यावसायिक अभ्यासक्रम अर्थात आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. व्यवसाय‍ शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत राज्यात सुरू असलेल्या शासकीय आणि खासगी आयटीआयच्या प्रवेशासाठी तिसऱ्या दिवशी तब्बल ७१ हजार ३७४ जणांनी नोंदणी केली असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली.

राज्यात सध्या अकरावी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अकरावी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापेक्षा आयटीआयच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे.

तिसऱ्या दिवशी ७१ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी गुरुवारी नोंदणी केली. त्यापैकी ६२ हजार ४६० जणांचे अर्ज पूर्ण भरले आहेत; तर दुसरीकडे यातील ५९ हजार ३८९ जणांनी प्रवेश शुल्क भरल्‍याची माहिती संचालक दिगंबर दळवी यांनी दिली.

राज्यात एकूण ४१८ शासकीय व ५७४ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एकूण १ लाख ५४ हजार ३९२ प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत. यामध्ये उपलब्ध जागांपैकी ५३ हजार ६०० जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर उर्वरित जागा राखीव कोट्यातील आरक्षणानुसार भरल्या जाणार आहेत.

आयटीआयमध्ये ८३ प्रकारचे ट्रेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये यंदा पहिल्यांदाच एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com