आफ्रिकी महिलेकडून 12 कोटींचे कोकेन जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

मुंबई - कोकेनची तस्करी करणाऱ्या महिलेला सोमवारी नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. म्वासे विझेगो असे तिचे नाव आहे. तिच्याकडून 12 कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले. ती पहिल्यांदाच मुंबईत आली होती. मुंबईत तिचे कुणाशी संबंध आहेत, याचा शोध सुरू आहे. 

परदेशातून अमली पदार्थ घेऊन आलेले तस्कर मुंबईतील संबंधितांशी सांकेतिक भाषेत बोलतात. अमली पदार्थ पोचवल्यावर तस्कर लगेच परत जातात. आफ्रिकेतील ही महिला सोमवारी सहार विमानतळावर दोन किलो कोकेन घेऊन येणार असल्याची माहिती "एनसीबी'ला मिळाली. सापळा रचून अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. तिने कोकेन दडवण्यासाठी खास जॅकेट बनवून घेतले होते. या कोकेनची किंमत 12 कोटी आहे. 

काही महिन्यांपूर्वी आखाती देशातून अमली पदार्थ घेऊन येणाऱ्या एका महिलेला एनसीबीने गजाआड केले होते. म्वासे हा अमली पदार्थ कुणाला देणार होती याचा शोध घेतला जात आहे, असे एनसीबीचे (पश्‍चिम विभाग) संचालक संजय झा यांनी "सकाळ'ला सांगितले. जप्त केलेल्या कोकेनमध्ये मिश्रण करून ते विकले जाणार होते, असे म्वासे हिने एनसीबीला प्राथमिक चौकशीत सांगितले. 

Web Title: 12 crore seized cocaine from African woman

टॅग्स