चेंबूरनंतर मुंबईत गिरगाव चौपाटीवर 12 कावळ्यांचा मृत्यू

समीर सुर्वे
Monday, 11 January 2021

चेंबूर येथील टाटा कॉलनी परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गिरगाव चौपाटीवरील बालोद्यनात 12 कावळ्यांच्या मृत्यूची घटना पुढे आली आहे.

मुंबई: चेंबूर येथील टाटा कॉलनी परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गिरगाव चौपाटीवरील बालोद्यनात 12 कावळ्यांच्या मृत्यूची घटना पुढे आली आहे. या मृत झालेल्या कावळ्यांचेही नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

देशात बर्ड फ्ल्यू पक्षांचा मृत्यू होत आहे. त्यातच आता मुंबईत मृतावस्थेतील कावळे आढळू लागले आहे. टाटा कॅालनी परिसरातील कावळ्यांचा मृत्यूची घटना उघड झाल्यानंतर आज गिरगाव चौपाटी येथील कावळ्यांच्या मृत्यूची घटना पुढे आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्या काही दिवसात या परिसरात 12 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी दिली. या कावळ्यांचे नमुने राज्याच्या पशु संवर्धन विभागाने गोळा केले असून ते पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा- कंगना राणावतला दिलासा, समन्स बजावण्यास तूर्तास पोलिसांना मनाई

शहरातील बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने युद्ध पातळीवर उपायोजना आखाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. कोविडमुळे गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असली तरी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात चौपाटी आणि बालोद्यानात येत असतात. या कावळ्यांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे) 

12 crows died Girgaon Chowpatty in Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 crows died Girgaon Chowpatty in Mumbai