esakal | मोठी बातमी: शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरुन आली मोठी अपडेट
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी: शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरुन आली मोठी अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओक वरील एकूण १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये.

मोठी बातमी: शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरुन आली मोठी अपडेट

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओक वरील एकूण १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे शरद पवार आणि कुटुंबीयांमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही.

शरद पवारांच्या बंगल्यावरील ज्या १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. त्यामध्ये एका ड्रायव्हरचा समावेश आहे. काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. शरद पवार आणि सर्व कुटुंबीयांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. सध्याच्या संवेदनशील काळात दौरे करू नका अशी शरद पवारांना विनंती करणार असल्याचंही राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत. 

मोठी बातमी - गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईकरांना मिळणार आनंदाची बातमी; दूर होणार मोठे संकट

आज सकाळी ही बातमी समोर आली. ज्यामध्ये शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. सकाळी जी माहिती समोर येत होती. त्यामध्ये एकूण सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं. दरम्यान काहींचे रिपोर्ट येणं बाकी होतं. दरम्यान, आता समोर येणाऱ्या माहितीत आणखीन सहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. यामध्ये दोन वाहन चालक आहेत. यापैकी एक सुप्रिया सुळे यांचे वाहन चालक आणि शरद पवारांच्या स्वीय सहाय्यकांचे देखील वाहन चालक असल्याचं समोर येतंय. या सोबतच इतरही ड्युटीवरील कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह आल्याचं समोर येतंय.    

12 workers working at silver oak detected positive sharad pawar tested negative

loading image