बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 120 कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

Sahyadri
Sahyadri

मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेतली. 

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी लागणारे पंधरा कोटी रुपये त्वरित देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. तसेच बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या कामासाठी एकूण 280 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची बाब शरद पवार व अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज येत्या ऑगस्ट महिन्यात सुरू होणार हे आज झालेल्या बैठकीत निश्चित झाले. याप्रसंगी डॉ. वाकोडे, डॉ. संजय मुखर्जी, अर्थ विभागाचे सचिव व्यास, तसेच बारामतीचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय कुमार तांबे हेही उपस्थित होते.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहासह इतर सर्व प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वेळेस सुरू झाले, तर त्याचा फायदा तालुक्यातील सर्व नागरिकांना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com