esakal | ठाण्यातील १२३ मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यातील १२३ मंडळ परवानगीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील (Thane) १२३ मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत नवरात्रोत्सव मंडळे मंडप उभारणीच्या प्रतीक्षेत आहेत. पोलिस (Police) , अग्निशमन, वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने ते प्रतीक्षा यादीत आहेत.

हेही वाचा: ठाण्यातील खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हायकोर्टात याचिका

विशेष म्हणजे दिवा प्रभागातून १६ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी कुणालाही अद्याप मंडप उभारण्याची परवानगी मिळालेली नाही. यंदा नियम आणि निर्बंधांची अंमलबजावणी करत मंडप उभारण्याची मुभा आयोजकांना देण्यात आली आहे. मात्र मंडप उभारण्यापूर्वी पालिकेची परवानगी बंधनकारक केली आहे. त्यानुसार ६ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने १०३, तर ऑफलाईनद्वारे १०७ मंडळांनी परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज केला होता. त्याची छाननी करून पालिकेने २१४ पैकी ९१ मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे.

loading image
go to top