मालगाडीच्या अपघातामुळे 13 मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द; 40 पेक्षा जास्त रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

13 Mail-Express trains canceled due to freight train accident Impact on schedule 40 railway trains mumbai

मालगाडीच्या अपघातामुळे 13 मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द; 40 पेक्षा जास्त रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मालखेड आणि तिमातला स्थानकांदरम्यान रविवारी रात्री कोळशाने भरलेली मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळें मालगाडीचे 20 डबे रेल्वे रुळावरून खाली घसरले आहे. त्यामुळे अप- डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. आतापर्यंत 13 मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द तर, 40 पेक्षा जास्त मेल-एक्सप6 गाड्यांचा मार्ग वळवण्‍यात आला आहे. या घटनेमुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11 वाजून 15 मिनिटांचा सुमारास मालखेड रेल्वे स्थानकादरम्यान कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीचा अपघात झालेला आहे. ही मालगाडी नागपूरवरून भुसावळकडे जात होती. यादरम्यान मालगाडीचा अपघात होऊन 20 रेल्वे डबे रुळाखाली घसरले. या अपघात कोणत्याही प्रकारची जीवत हानी झाली नाही; मात्र, रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या युद्धपातळीवर रेल्वे रुळावरून मालगाडीचे डबे बाजूला काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे 60 गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून आतपर्यंत 13 मेल-एक्सप्रेस रेल्‍वे गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत, तर जवळ 40 रेल्वे गाड्यांचा मार्ग वळवण्‍यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत म्हणून मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे.

हेल्पलाईन नंबर-

नागपूर- 0712-2544848

सीएसएमटी-022-22694040

एलटीटी 9321336835

कल्याण - 0251-2311499

दादर- 022-24114836, ठाणे-9321336747

पनवेल- 9004410777

अपघाताची होणार चौकशी-

सर्वप्रथम मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नेमकं हा अपघात कशामुळे घडला याच्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच नेमक अपघाताचे कारण समोर येईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

"या" गाड्या रद्द केल्या -

11122 वर्धा-भुसावळ पॅसेजर, 12140 नागपूर-सीएसएमटी (धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द), 12119 अमरावती-नागपूर एक्सप्रेस, 11040 गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस, 01372 वर्धा-अमरावती एक्सप्रेस, 17642 नरखेर-काचेगुडा जेसीओ एक्सप्रेस, 11121 भुसावळ-वर्धा एक्सप्रेस, 12106 गोंदिया-सीएसएमटी एक्सप्रेस,12136 नागपूर-पुणे एक्सप्रेस, 12120 अजनी-अमरावती एक्सप्रेस, 12140 नागपूर-सीएसएमटी एक्सप्रेस, 01374 नागपूर-वर्धा एक्सप्रेस आणि 12139 सीएसएमटी-नागपूर एक्सप्रेस

- या गाड्या वळविल्या !

-20819 पुरी-ओखा एक्सप्रेस वाडी-दौंड-मनमाड-जळगाव मार्गे

- 12656 चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस, नारखेर-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे,

- 12834 हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस पुलगाव-नागपूर-नारखेर-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे,

- 12860 हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस नागपूर-नारखेर-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे

- 12129 पुणे-हावडा एक्सप्रेस बडनेरा-चांदूर बाजार-नारखेर-नागपूर मार्गे,

- 12844 अहमदबा-पुरी एक्सप्रेस बडनेरा-चांदूर बाजार-नारखेर-नागपूर मार्गे

- 18029 एलटीटी-शालिमार एक्सप्रेस बडनेरा-चांदूर बाजार-नारखेर-नागपूर मार्गे

शॉर्ट टर्मिनेटेड गाड्या-

- 12160 जबलपूर-अमरावती एक्सप्रेस नागपूर येथे

- 12406 निजामुद्दीन-भुसावळ एक्सप्रेस नागपूर येथे