131 परदेशी नागरिकांची धरपकड; करायचे 'असे' काही..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

गेल्या वर्षभरात नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदा राहणाऱ्या 54 परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले. तसेच 77 घुसखोर परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन, त्यांची आपापल्या देशांत रवानगी केली. यामध्ये नायजेरियन, बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. 

नवी मुंबई : गेल्या वर्षभरात नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदा राहणाऱ्या 54 परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले. तसेच 77 घुसखोर परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन, त्यांची आपापल्या देशांत रवानगी केली. यामध्ये नायजेरियन, बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. 

ही बातमी वाचली का? पालकांनो..! तुमच्या मुलांची सुरक्षा धोक्यात...

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत उलवे, खारघर व इतर भागांत आफ्रिकन देशांतील नागरिक बेकायदा राहत आहेत, तसेच त्यातील अनेक परदेशी नागरिक हे गुन्हेगारी कारवाया करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी 2018-19 या वर्षात उलवे, खारघर व इतर भागांत छापेमारी करून त्या ठिकाणी राहणाऱ्या परदेशी नागरिकांचे पासपोर्ट व व्हिसाची तपासणी केली होती. या तपासणीत 54 विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्याचे आढळून आले. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या पारपत्र विभागाने या 54 परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या देशात रवाना केले. याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी 2018 व 19 या दोन वर्षांत वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवून 70 घुसखोर बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून 77 बांगलादेशी नागरिकांची त्यांच्या देशात रवानगी केली. यापुढेदेखील बेकायदा वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा व घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची धरपकड करण्याची कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? या पिकामुळे शेतकऱ्यांचे चेहरे पांढरे

घुसखोरांचे बस्तान
पश्‍चिम बंगालमार्गे बेकायदा भारतात प्रवेश करणारे बांगलादेशी नागरीक हे मुंबई, नवी मुंबई परिसरात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. यातील पुरुष मंडळी बांधकाम साईटवर मिळेल ते काम करतात; तर महिला घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. हे बांगलादेशी नागरिक कोणतीही कागदपत्रे न देता झोपडपट्टीत भाड्याने राहतात. त्यामुळे ते घुसखोर म्हणून ओळखले जातात. घरमालकाला त्यांच्याकडून चांगले भाडे मिळत असल्यामुळे, तेदेखील त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत नाहीत. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर वर्षानुवर्षे या ठिकाणी राहतात.

ही बातमी वाचली का? पुस्तक म्हणजे फॅशन नाही

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी
नायजेरियन नागरिक पर्यटन, शिक्षण, व्यवसाय अथवा वैद्यकीय व्हिसावर भारतात प्रवेश करतात. त्यानंतर हे नायजेरियन अथवा शैक्षणिक व्हिसा मिळवून भारतात येतात. त्यानंतर ते या ठिकाणी आपले बस्तान मांडून, गैरधंदे करायला सुरुवात करतात. भारतात आलेले बहुतांश नायजेरियन नागरिक हे ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक तरुण-तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अनेक नायजेरियन नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील ते याच ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून आढळून आले आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या नागरिकांवर कायमची बंदी घालण्यात यावी. यासाठी त्यांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 
- संजय कुमार, पोलिस आयुक्त, नवी मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 131 foreign citizens arrested navi mumbai police