पालघर किनाऱ्यावरून 14 बांगलादेशी तरूण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

डहाणू येथील कोस्टल सिक्योरिटी एक्साइजद्वारा ही मोहीम राबविताना कमांडर एम. विजयकुमार आणि त्यांच्या टीमने कारवाई केली. ही बोट ठाण्यावरून वसई अरबी समुद्रात आल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. बाकी 4 बोटीतून 18 ते 20 जण पळून गेले असल्याची माहिती कॉस्ट गार्डनी या प्रकरणी 14 संशयित बांगलादेशी आरोपीयांना चौकशीसाठी वसई पोलिसांच्या ताब्यात दिले असून वसई पोलिसांनी 14 आरोपींवर गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहेत.

पालघर : किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात शनिवारी संशयित 14 बांगलादेशी तरुणांना कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहे. 

वसई येथील पानजु बेटानजीक अरबी समुद्रात रेती काढणाऱ्या 6 बोटीमधील 2 बोटींचा पाठलाग करून कोस्टगार्डने 14 संशयित बांगलादेशींना ताब्यात घेतले. कोस्टगार्ड आपल्या सजग मोहीम अंतर्गत शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास एच 194 या होवरक्राफ्ट बोटीने तपासणी मोहिमेवर गेले असता ही कारवाई करण्यात आली. कोस्टगार्डने आरोपींचे तपासणी केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे बोटीचे परवाने व कागदपत्र नसल्याचे उघड झाले आहे. तरुणांकडे कुठल्याहीप्रकारची ओळखपत्रे नसल्याचे धक्कादायक बाब समोर आल्याने पुन्हा समुद्राची सुरक्षा राम भरोसे असल्याचे समोर येत आहे.

डहाणू येथील कोस्टल सिक्योरिटी एक्साइजद्वारा ही मोहीम राबविताना कमांडर एम. विजयकुमार आणि त्यांच्या टीमने कारवाई केली. ही बोट ठाण्यावरून वसई अरबी समुद्रात आल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. बाकी 4 बोटीतून 18 ते 20 जण पळून गेले असल्याची माहिती कॉस्ट गार्डनी या प्रकरणी 14 संशयित बांगलादेशी आरोपीयांना चौकशीसाठी वसई पोलिसांच्या ताब्यात दिले असून वसई पोलिसांनी 14 आरोपींवर गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 14 bangladeshi youth arrested for coast guard near Palghar