14 इंग्रजी शाळा अनधिकृत 

14 इंग्रजी शाळा अनधिकृत 

नवी मुंबई - पालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील 14 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. विनापरवाना सुरू असलेल्या या शाळांमध्ये लाखोंच्या संख्येत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी या शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्यास पालकांनी तो प्रवेश रद्द करून जवळपासच्या मान्यताप्राप्त खासगी किंवा पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

नवी मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या विनापरवाना 14 शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. यातील अनेक शाळा सुरू होऊन काही वर्षे झाली आहेत. शिक्षण संस्था चालवण्यासाठी आवश्‍यक परवानग्या न घेताच संस्थाचालक शाळा सुरू करत असून पालक या गोष्टींपासून अनभिज्ञ असतात. अशा शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असते; मात्र प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अशा शाळांच्या संस्थाचालकांचे फावते. 

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीतील शाळा ः नेरूळ सेक्‍टर 21 येथील "राईट वे इंग्लिश स्कूल', घणसोली सेक्‍टर 5 "सरस्वती विद्यानिकेतन स्कूल' (प्रकरण न्यायप्रविष्ट), बेलापूरमधील "अल मोमीना स्कूल', "इकरा इंटरनॅशनल स्कूल' (नेरूळ), "नवी मुंबई ख्रिश्‍चन इंग्लिश स्कूल' (तुर्भे), "रोज बड्‌स स्कूल' (तुर्भे), "ऑर्किडस इंटरनॅशनल स्कूल' (वाशी), "आदर्श कॉन्व्हेंट स्कूल' आणि "आर. व्ही. व्ही. इंटरनॅशनल स्कूल' (महापे), घणसोलीतील "सेंट जुडे स्कूल', "आचिव्हर्स वर्ल्ड प्रायमरी स्कूल' आणि "इम्पाइसिस इंग्रजी स्कूल', रबाळेतील "इलिम इंग्लिश स्कूल आणि प्रशिक इंग्लिश स्कूल या शाळा अनधिकृत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com