
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते ठाणे व बदलापूर मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित लोकलना उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने आता हार्बर मार्गावरही एसी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत हार्बर मार्गावर १४ नव्या एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.