
डोंबिवली : 9 - 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेशची अधिसूचना निघून 14 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप पालिकेने या गावांचे दप्तर ताब्यात घेतलेले नसल्याने गावांचा समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्व पक्षीय विकास समिती याविषयी सातत्याने पाठपुरावा करत आहे, परंतु केवळ आश्वासन त्यांना मिळत आहे. गावांचा विकास रखडल्याने विकास समिती मधील सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी सोमवारी याचा जाहीर निषेध करत आपल्या पदांचा राजीनामा देणार होते. प्रत्यक्ष आंदोलनात त्यांचे राजीनामे बाहेर निघालेच नाहीत. पुन्हा एकदा त्यांना सत्ताधारी पक्षातील वरिष्ठांकडून मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन देण्यात आले आहे.