esakal | साकीनाका बलात्कारानंतर उल्हासनगर हादरलं, पडक्या घरात डांबून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

उल्हासनगर हादरलं! पडक्या घरात डांबून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

ठाणे : मुंबईतील साकीनाका (sakinaka physical abused) येथे शुक्रवारी झालेल्या बलात्कारामुळे शनिवारी पीडितेचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरले. आता आणखी उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ आणखी अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलीला एका पडक्या खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार (ulhasnagar physical abused) करण्यात आला.

हेही वाचा: साकीनाका दुर्देवी घटनेचे राजकारण करु नका - संजय राऊत

दादा उर्फ श्रीकांत गायकवाड (30) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही शनिवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत स्कॉयवॉकवर उभी होती. यावेळी आरोपीने तिच्या डोक्यात हातोडा मारला. त्यानंतर तिला जबरदस्तीने जवळच्या पडक्या घरात नेले. तिथे तिला डांबून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिच्या मित्रांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, मुंबई आणि ठाणे परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शुक्रवारी सकाळीच साकीनाका भागात एका टेम्पोमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. अत्यंत अमानुष पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आला होता. अखेर शनिवारी तिचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी पुण्यात देखील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता राज्यात खरंच महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

loading image
go to top