रोलीमध्ये नगरसेवकांकडून 15 रिक्षांची तोडफोड 

रोलीमध्ये नगरसेवकांकडून 15 रिक्षांची तोडफोड 

वाशी - ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाहेर रस्त्यात रिक्षा उभ्या करून रिक्षा प्रवाशांची चढ-उतार करणाऱ्या रिक्षांवर रिक्षा चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष व नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सोमवारी (ता. 13) सकाळी आठच्या सुमारास हल्ला चढवत सुमारे 10 ते 15 रिक्षांची तोडफोड केली. या वेळी रिक्षांच्या काचा, इंडिकेटर फोडण्यात आले. यामुळे संतप्त रिक्षाचालकांनी रबाळे पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत पोलिसांना तक्रार अर्ज दिला. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परमिट खुले केल्यामुळे शहरात रिक्षांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची प्रवासी घेण्यासाठी चढाओढ सुरू असते. त्यातच राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मिळेल त्या ठिकाणी फलक लावून रिक्षा स्टॅण्ड उभारण्यात येत आहेत. अशा रिक्षा स्टॅण्डवर फक्त राजकीय नेत्यांशी संबंध असणाऱ्या रिक्षाचालकालाच रिक्षा उभ्या करू देतात; तर ज्या रिक्षाचालकांना कोणताच रिक्षा स्टॅण्ड थारा देत नाही, ते रिक्षाचालक मिळेल त्या ठिकाणी रिक्षा उभ्या करून वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा करीत आहेत. 

ऐरोली रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर पार्क करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रिक्षांवर शिवसेनेचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी तोडफोड केली. या संदर्भात रबाळे पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलिसांनी "तुम्ही कशावरून पत्रकारच बोलत आहात,' अशी उडवाउडवीचे उत्तरे देत बोलण्यास टाळाटाळ केली. 

ऐरोली रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रिक्षा पार्क करण्यात येतात. त्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना चालणे जिकरीचे होते. आरटीओ व वाहतूक पोलिसही याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नाईलाजास्तव रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला. 
- मनोज हळदणकर,  उपाध्यक्ष, ऐरोली रिक्षा चालक-मालक संघटना 

ऐरोली रेल्वेस्थानकासमोर प्रवासी सोडत असताना नगरसेवक मनोज हळदणकर यांनी माझ्या रिक्षावर दगड घालून गाडीची तोडफोड केली. रिक्षावर कारवाईचा अधिकारी हा वाहतूक पोलिस किंवा आरटीओचा आहे. माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आल्यामुळे रबाळे पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे. 
- किशोर काळे, रिक्षाचालक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com