पावसाळ्यापूर्वी दीड हजार रस्ते चकाचक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - महापालिकेने आतापर्यंत ८७९ रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. ५२२ रस्त्यांची दुरुस्ती मे अखरेपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सुमारे एक हजार ४०० रस्ते चकाचक होणार आहेत.

महापालिकेने गेल्या वर्षी दुरुस्ती सुरू केलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. या वर्षी ८५२ कोटी रुपयांची एक हजार १०६ रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यातील ५२२ रस्त्यांची दुरुस्ती मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा पालिकेच्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता विनोद चिटोरे यांनी केला.

रस्तेदुरुस्तीसाठी महापालिकेने टप्पे ठरवले आहेत. त्यात प्रकल्प रस्ते म्हणजे ज्या रस्त्यांची दुरुस्ती पूर्णपणे करण्यात येणार आहे; तर प्राधान्यक्रम रस्ते म्हणजे रस्त्याचा पृष्ठभाग दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यातही तीन प्रकारांत वर्गवारी करून रस्त्याच्या वापरानुसार कामे हाती घेण्यात आली आहेत. 

गेल्या वर्षी सुरू झालेल्या दुरुस्तीसह पावसाळ्यापूर्वी एक हजार ४६२ रस्त्यांची दुरुस्ती करायची होती. त्यातील ५२२ रस्त्यांची दुरुस्ती मे अखरेपर्यंत पूर्ण होणार आहे. उर्वरित रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या वर्षी दुरुस्त करायच्या रस्त्यांपैकी ५८४ रस्त्यांची दुरुस्ती पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे.

Web Title: 1500 road repairing cleaning before rainy season