esakal | मुंबईत बुलेट ट्रेनसाठी १५२ झाडं तोडणार; शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत बुलेट ट्रेनसाठी १५२ झाडं तोडणार; शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष

मुंबईत बुलेट ट्रेनसाठी १५२ झाडं तोडणार; शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : ठाणे महापालिकेने बुलेट ट्रेनसाठी दिवा येथील भूखंड देण्यास होकार दिल्यानंतर आता वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रस्तावित स्थानकासाठी १५२ झाडे तोडण्यासाठी ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन’ने परवानगी मागितली आहे. याबाबत महापालिकेने सूचना व हकरती मागवल्या असून बुधवारी (ता. १५) सुनावणी होणार आहे. बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी झाडे तोडण्याबाबत शिवसेना आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘मेट्रो- ७ अ’साठीही १३९ झाडांचा बळी जाणार आहे.

हेही वाचा: साकीनाका प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांनी विरोध केला आहे. शिवसेनेचा तर या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध होता; मात्र काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या महासभेने बुलेट ट्रेनसाठी दिवा येथील भूखंड देण्याची परवानगी दिली. त्यातच आता मुंबईतील स्थानकासाठी झाडे तोडण्यासाठी प्रशासकीय परवानगी मिळण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे आला आहे.

पालिका प्रशासनाकडे हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून सादर झालेल्या प्रस्तावानुसार ११ झाडे तोडण्याबरोबरच १४१ झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. सूचना व हकरती सादर करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून बुधवारी(ता. १५) दुपारी २.३० ते ३ या वेळात भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील उद्यान विभागाच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडला जाणार आहे. त्यात शिवसेनेसह कॉंग्रेस काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: भारतानं पूर्ण केला 75 कोटी लसीकरणाचा टप्पा; WHOकडून कौतुक

मेट्रोसाठी १३९ झाडांचा बळी

मेट्रो ७ अ टप्प्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील १३९ झाडांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यातील ५५ झाडे तोडण्याची आणि ८४ झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी महापालिकेकडे मागण्यात आली आहे. त्यावरही सुनावणी घेतली जाणार आहे.

loading image
go to top