ठाणेकर! स्वातंत्र्यदिनी 'ही' खास बातमी तुमच्यासाठी, नक्की वाचा

ठाणेकर! स्वातंत्र्यदिनी 'ही' खास बातमी तुमच्यासाठी, नक्की वाचा

मुंबईः ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्येत घट होताना पाहायला मिळतेय. ठाणे जिल्ह्यातल्या कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. अशातच आजपासून ठाण्यातील सर्व दुकानं सुरु झाली आहेत. आजपासून सर्व दुकानं सुरु ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेनं परवानगी दिली आहे.  ही सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली असतील. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.  ठाणे शहरातील जी आस्थापने P1 आणि P2 नुसार सुरु होते, ती आजपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरु ठेवण्यात येतील.

दरम्यान मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेण्यात येणार आहे.  त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यात. तसंच सिनेमागृहे अजून काही काळ बंद असणार आहेत.

व्यापाऱ्यांना सूचना

गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासोबत मास्क घालणं, सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करणं,  दुकानामध्ये काम करणाऱ्या सर्वाची चाचणी करावी. तसंच राज्य सरकारसह महापालिका प्रशासनानं ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत ,त्यांचे पालन होईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक व्यापाऱ्यांची असेल अशा सूचनाही देण्यात आल्यात.

एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नसून ठाणे महापालिका चांगलं काम करतेय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांचं सहकार्याची गरज असल्याचं एकनाथ शिंदे व्यापारी संघटनांच्या बैठकीत म्हणालेत. 

जून महिन्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर कोरोनाचा प्रार्दुभाव ठाणे महापालिका क्षेत्रात वाढला होता. हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मांनी २ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता.  त्यानंतर सम-विषम पद्धतीने दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याआधी चार महिने लॉकडाऊनमुळे दुकानं बंद ठेवण्यात आली होती.

15th august from today all shops open in thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com