पोलिस असल्याची बतावणी करून  १६ लाखांची लूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

भिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची रिक्षा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवली. पोलिस असल्याची बतावणी करून त्यांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडील १५ लाख ९१ हजार ८३० रुपयांची रोकड व १० हजारांचा मोबाईल असलेली बॅग लांबवली. या प्रकरणी सहा आरोपींना कोनगाव पोलिसांना अटक केली असून, कुरिअर कंपनीच्या मालकानेच लूटमार करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. 

जयेश श्रीकांत सावंत, विकास प्रकाश घाग, दीपक गोपीनाथ महाराणा, गौतम हसमुख शाह, मनोज लालमन विश्‍वकर्मा आणि कुरिअर कंपनीचा मालक परवीन बेचरदास पटेल अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Web Title: 16 lac robbery in bhiwandi