चिंता वाढली! मुंबईत गेल्या 24 तासात 1,622 कोरोना रुग्णांची भर; तर इतक्या रुग्णांचा मृत्यू

मिलिंद तांबे
Wednesday, 2 September 2020

मुंबईत रूग्णवाढीच्या दरात किंचित वाढ झाली असून 0.87 वरून हा दर 0.92 टक्क्यांवर गेला आहे. आज 1,622 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,48,569 झाली आहे.

मुंबई : मुंबईत रूग्णवाढीच्या दरात किंचित वाढ झाली असून 0.87 वरून हा दर 0.92 टक्क्यांवर गेला आहे. आज 1,622 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,48,569 झाली आहे. तर, आज 34 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,724 वर पोहोचला आहे. दरम्यान, आज 838 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे. 

मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची -

मुंबईत आज झालेल्या 34 मृत्यूंपैकी 23 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 24 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश होता. त्यातील 27 रुग्णांचे वय 60 हून अधिक होते. तर, 7 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते.                   
मुंबईत 562 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,284 आहे. गेल्या 24 तासात बाधितांच्या संपर्कात आलेले 5,106 अति जोखमीच्या व्यक्ती आढळल्या आहेत. 

बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; मुंबईतून एकाला अटक 

रुग्णदुपटीचा कालावधी 76 दिवसांवर
मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 76 दिवसांवर गेला आहे. आतापर्यंत 1,19,702 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 29 ऑगस्टपर्यंत मुंबईत एकूण 7,84,392  कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1,622 corona patients in Mumbai in last 24 hours; So many patients die