esakal | १६ फेब्रुवारीला कामोठ्यात ‘चला हवा येऊ द्या’
sakal

बोलून बातमी शोधा

१६ फेब्रुवारीला कामोठ्यात ‘चला हवा येऊ द्या’

दिवंगत बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व झेंडा सामाजिक संस्थेतर्फे कामोठेकरांसाठी १६ फेब्रुवारीला ‘चला हवा आली कामोठ्यात’ या खास धमाल विनोदाची मेजवानीचे आयोजन केले आहे.

१६ फेब्रुवारीला कामोठ्यात ‘चला हवा येऊ द्या’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : दिवंगत बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व झेंडा सामाजिक संस्थेतर्फे कामोठेकरांसाठी १६ फेब्रुवारीला ‘चला हवा आली कामोठ्यात’ या खास धमाल विनोदाची मेजवानीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमातून तिकिटांच्या माध्यमातून गोळा होणारा नफा गोरगरिबांच्या मुलांना आश्रय देणाऱ्या पनवेल तालुक्‍यातील नेरे येथील सील आश्रमाला देणगी स्वरूपात दिला जाणार आहे. या कार्यक्रमाचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. 

ही बातमी वाचली का? आझाद मैदानात भगवे चैतन्य

मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता पहिल्यांदाच ‘चला हवा येऊ द्या’ची टीम नवी मुंबईतील कामोठे शहरात येणार आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार भाऊ कदम, डॉ. नीलेश साबळे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भरत गणेशपुरे आणि अभिनेत्री श्रेया बुगडे आदी विनोदी कलाकार ‘चला हवा आली कामोठ्यात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत फक्त टीव्हीवर पाहिलेल्या या कलाकारांना प्रत्यक्ष विनोद करताना पाहण्याची संधी या कार्यक्रमातून उपलब्ध होणार आहे. या हास्य आणि धमाल उडवून देणाऱ्या या विनोदी कार्यक्रमासोबतच प्रक्षेकांना सारेगामा विजेता अभिजित कोसंबी, चिमणी उडाली फेम कविता राम यांच्या सुरेल आवाजात गीतांचा खास नजराणा मिळणार आहे. तसेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश भास्कर सरवणकर यांनी दिग्दर्शित केलेले नृत्याविष्कार पाहण्यास मिळणार आहे. झेंडा सामाजिक संस्था व दिवंगत बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय या संस्थांमार्फत दर वर्षी कामोठे शहरात विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमातून समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात.

ही बातमी वाचली का? नवी मुंबईकरांनो... केव्हाही पडू शकता आगीच्या भक्ष्यस्थानी!

या ठिकाणी होणार कार्यक्रम
१६ फेब्रुवारीला रविवारी संध्याकाळी ६ ते १० या वेळेत खांदा कॉलनी सिग्नलशेजारी, सर्कस मैदानावर हा भव्य कार्यक्रम होणार आहे. खांदेश्‍वर व मानसरोवर रेल्वेस्थानकांच्या बाहेर तिकीट उपलब्ध आहेत.