esakal | नवी मुंबईकरांनो... केव्हाही पडू शकता आगीच्या भक्ष्यस्थानी!
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईकरांनो... तुम्ही केव्हाही पडू शकता आगीच्या भक्ष्यस्थानी!

पामबीच रोडवरील सीवूडस्‌मधील सी-होम्स या इमारतीला लागलेल्या आगीनंतर शहरातील बहुतांश इमारतींमध्ये बसवण्यात आलेल्या आग विझवणाऱ्या यंत्रणा बंद असल्याचे अग्निशमन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील रहिवासी इमारती केव्हाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्‍यता जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.  

नवी मुंबईकरांनो... केव्हाही पडू शकता आगीच्या भक्ष्यस्थानी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पामबीच रोडवरील सीवूडस्‌मधील सी-होम्स या इमारतीला लागलेल्या आगीनंतर शहरातील बहुतांश इमारतींमध्ये बसवण्यात आलेल्या आग विझवणाऱ्या यंत्रणा बंद असल्याचे अग्निशमन विभागाच्या निदर्शनास आले आहे. अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत असलेल्या आत्तापर्यंत ४०० पेक्षा जास्त इमारतींना अग्निशमन विभागाने गेल्या तीन वर्षांत नोटिसा बजावल्या आहेत. यातील एकट्या नेरूळमधील १२२ इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे इमारतींच्या छतावर घेण्यात येत असलेल्या खासगी शिकवण्यांमध्येही आग विझवण्याची यंत्रणा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शहरातील रहिवासी इमारती केव्हाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्‍यता जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.  

ही बातमी वाचली का? हवालदाराचा अपघाती मृत्यू

दर वर्षी पावसाळ्यादरम्यान पालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शहरातील इमारतींमध्ये आगप्रतिबंधात्मक उपाययोजना नसलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या जातात. त्यादरम्यान त्यांना आगप्रतिबंधात्मक यंत्रणा बसवण्यासाठी मुदत दिली जाते. मात्र महापालिकेच्या नोटिशीनंतरही अनेक इमारतींच्या पदाधिकाऱ्यांकडून उपाययोजना करत नसल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. इमारत तयार करताना अग्निशमन विभागाकडून इमारतीमध्ये आगप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते. त्यानंतर इमारतीमध्ये यंत्रणा बसवण्यात आल्याची प्रत्यक्ष पाहणीनंतर भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते; परंतु इमारतीमध्ये एकदा रहिवाशांचा अधिवास सुरू झाला की खबरदारींच्या उपाययोजनांकडे सोसायटीतील पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते. एखादे वेळी इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडल्यावर आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना त्रासाला सामोरे जावे लागते. 

ही बातमी वाचली का? आझाद मैदानात भगवे चैतन्य

सी होम्सचा निष्काळजीपणा 
सीवूड्‌स येथील सी-होम्स इमारतीच्या 20 आणि 21 व्या माळ्याला लागलेली आग विझवण्यासाठी जवान पोहोचले. तेव्हा लक्षात आले की इमारतीमध्ये बसवण्यात आलेली आग विझवणारी यंत्रणा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे शेजारच्या इमारतीमधून पाणी घ्यावे लागले. आग विझवण्यासाठी दुसरीकडून पाणी तसेच ब्रान्टो शिडीचा वापर करावा लागल्यामुळे आग आटोक्‍यात आणताना पाच तासांचा अवधी लागला. याबाबत शहरातील सर्व प्रकारच्या इमारतींना आग विझवणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत नोटिसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी पी. व्ही. जाधव यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? संरक्षक कठड्यालाच कारची धडक

सीवूड्‌समधील सी-होम्स इमारतीला लागलेली आग महापालिकेच्या जवानांनी शर्थीने विझवली; मात्र या आगीबाबत सोमवारी अग्निशमन विभागाचा अहवाल हाती आल्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यावर निर्णय घेतला जाईल. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका 
 

loading image