esakal | आझाद मैदानात मनसेमध्ये भगवे चैतन्य 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सीएए आणि एनआरसीविरोधकांच्या विरुद्ध राज ठाकरे यांचा एल्गार 

आझाद मैदानात मनसेमध्ये भगवे चैतन्य 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनसेने राजकीय भूमिका बदलल्यानंतर काढलेल्या पहिल्या मोर्चावेळी कार्येकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले होते. हजारो मनसैनिकांमुळे आझाद मैदान आणि हिंदू जिमखाना परिसर भगवामय झाला होता. पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर तसेच हिंदू जिमखाना तसेच आझाद मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

मोठी बातमी पाचशे रुपयांसाठी केला ब्लेडने हल्ला

आझाद मैदानात रविवारी राज ठाकरे सीएए आणि एनआरसीविरोधकांच्या विरुद्ध एल्गार पुकारत घुसखोरांना हाकलविणार व नव्या राजकीय इनिंगची सुरुवात करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. मुंबईसह देशभरातून कार्यकर्त्यांचे जथ्थे आझाद मैदानाकडे सकाळपासूनच दाखल झाले होते. "भारत माता की जय, राज ठाकरे आगे बढो' अशा घोषणांनी आझाद मैदान आणि हिंदू जिमखाना परिसर दुमदुमून गेला होता. या परिसरात शिवमुद्रा असलेले भगवे झेंडे ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

ही बातमी वाचलीये का... हवालदाराचा अपघाती मृत्यू

मनसेच्या महामोर्चासाठी मुंबईसह देशभरातून कार्येकर्ते मोठ्या प्रमाणात येणार याचा अंदाज असल्याने पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर तसेच हिंदू जिमखाना तसेच आझाद मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यात दंगलग्रस्त नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. ड्रोन कॅमऱ्यांच्याही मोर्चातील हालचालींवर नजर होती. हिंदू जिमखाना येथे सकाळपासून कार्येकर्ते जमू लागले होते. राज्यभरातील कार्येकर्ते आदल्या दिवशीच रेल्वे, बस व खासगी वाहनांनी मुंबईत दाखल झाले होते. राज ठाकरे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

हे सुद्धा वाचा संरक्षक कठड्यालाच कारची धडक

राज यांनाही वाहतूक कोंडीचा फटका 
सकाळपासून पोलिस मॅरेथॉन असल्याने दुपारी साडेअकरापर्यंत शहर भागातील काही रस्ते बंद करण्यात आले होते. वाहनतळाची व्यवस्था गिरगाव चौपाटीवर करण्यात आली होती; मात्र तिथे न पोहचणाऱ्या कार्यकर्त्यांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने लावल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनाही मोर्चाच्या ठिकाणी काही अंतर चालावे लागले. आझाद मैदानातील भगव्या व्यासपीठावर राज ठाकरे यांची घुसखोरांना हाकलून द्या, ही छबी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत होती. 

ही बातमी वाचा कोरोना नव्हे, थंडीमुळे मासे महागले

शर्मिला ठाकरे यांनी जमिनीवर बसून ऐकले भाषण 
राज ठाकरे यांचे भाषण नीट पाहता व ऐकता यावे, यासाठी काहींनी जमिनीवर बैठक मारली. तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही जमिनीवर बसून संपूर्ण भाषण ऐकले. अमित ठाकरे यांच्या पत्नी तसेच राज ठाकरे यांच्या कन्या ऊर्वशी ठाकरे यांनीही जमिनीवर बसूनच भाषण ऐकले. 

हे सुद्धा वाचा टिटवाळ्यातील हा पूल होणार बंद

मनसेच्या मोर्चामागे भाजप : मनीषा कायंदे 
मनसेच्या मोर्चाचा शिवसेनेला फटका बसणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांचेच मुद्दे मनसे पुढे घेऊन जात आहे. पाकिस्तानी, बांगलादेशी हे मुद्दे त्यांना आताच का आठवले? गेली अनेक वर्षे मनसे कुठे होती? मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे. त्याचसोबत काही दिवसांपूर्वी शहा-मोदी यांना राजकीय पटलावरून बाजूला फेका, असा टोकाचा विरोध केला. आता सौम्य झाले आहेत, हे लोकांना दिसते. भाजपाला कधीच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येत नाही. त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या कायम लागतात. पहिले वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. आता मनसेला घेत आहेत. भाजपाचे आशीष शेलार वारंवार कृष्णकुंजला भेटीगाठी करतात. त्यानंतर हा मोर्चा निघतो. या मोर्चामागे भाजपाचा हात आहे, असा आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केला. 

मोर्चात संघ स्वयंसेवकांसह भाजपचेही कार्येकर्ते 
मोर्चात मनसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यातच काही दिवसांपासून भाजप आणि मनसेची जवळिक वाढत असल्याने भाजपाकडूनदेखील या मोर्चाला पाठबळ देण्यासाठी काही आरएसएसचे स्वयंसेवक, भाजपचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झालेले दिसत होते. 

सोशल नेटवर्किंग साईट 
या मोर्चात जास्तीत जास्त मनसैनिकांनी सहभागी व्हावे, यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्‌सची मदत घेण्यात आली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्हॉट्‌सऍप आणि फेसबुक पेजवर फलक आणि छायाचित्रे ठेवून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 
Bhgave consciousness in MNS in Azad Maidan

loading image