#COVID19 कोरोनाच्या संसर्गामुळे लालपरीलाही फटका!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळाने 11 ते 20 मार्चदरम्यान एक लाख 11 हजार 772 बसफेऱ्या रद्द केल्या असून, आंतरराज्य वाहतूक स्थगित केली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला 16 कोटी 93 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळाने 11 ते 20 मार्चदरम्यान एक लाख 11 हजार 772 बसफेऱ्या रद्द केल्या असून, आंतरराज्य वाहतूक स्थगित केली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला 16 कोटी 93 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

मोठी बातमी - महाविद्यालयाची वसतिगृहे 'क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर मुंबई-पुणे शिवनेरी आणि अश्‍वमेध सेवांचे सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 
एसटी महामंडळाचा संचित तोटा 6000 कोटींनी वाढला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लावण्यात आली होती. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटीच्या प्रवाशांमध्येही मोठी घट झाली आहे. राज्य सरकारने बसमधील गर्दी कमी करण्यासाठी दोन व्यक्तींच्या आसनावर एकाच प्रवाशाला बसवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 52 आसनी बसमधील प्रवाशांची संख्या 26 होणार असल्याने उत्पन्नात आणखी घट होत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या विभागांतून पुणे, स्वारगेट, दादर, औरंगाबाद, मंत्रालय, ठाणे, बोरिवली या मार्गांवर धावणाऱ्या वातानुकूलित शिवनेरी व अश्‍वमेध बसगाड्यांच्या 348 फेऱ्यांपैकी 95 टक्के फेऱ्या बंद करण्यात आल्यामुळे एसटीला मोठा फटका बसला आहे. 

17 crore loss to ST due to Corona

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 crore loss to ST due to Corona