Mumbai Crime News : संतापजनक! १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Mumbai Crime News : संतापजनक! १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. तर यामध्ये अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये जास्त प्रमाण दिसून येत आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची पावले उचलली जात असताना दुसरीकडे मुंबईतून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी १७ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध दिलं आणि त्यानंतर वांद्रे येथून तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला विरार येथील वज्रेश्वरी परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नराधम आरोपी इतक्यावर थांबले नसून त्यांनी मुलीवर अत्याचार करताना तिचे नग्न व्हिडीओ देखील बनवले. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला.

याबाबत कुणाला सांगितलं तर पीडितेला तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी सुद्धा या नराधमांनी दिली. दरम्यान, आरोपींचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता त्यामुळे पीडितेसह तिच्या आईने वांद्रे पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत दोन्ही नराधमांना अटक केली आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

टॅग्स :policecrimeMumbaiVideo