मुंबईत अपघातांत वर्षभरात  179 जणांनी गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

722 जण जखमी, घरे, भिंती कोसळून मृत्यूचे प्रमाण अधिक

मुंबई : मुंबईत गेल्या वर्षभरात झालेल्या तब्बल १३ हजार १५० विविध अपघातांमध्ये १७९ जणांचा मृत्यू; तर ७२२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यात आग लागणे, इमारतींचा भाग कोसळणे किंवा घरे आणि भिंती कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत...

मुंबईत आगी लागण्याचे प्रमाण वाढत असून पावसाळ्यात झाडे पडणे, घर, घरांच्या भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, गॅसगळती होऊन सिलिंडरचे स्फोट; तसेच नाले, नदी, समुद्र-खाडी, विहीर, खदानी, पूल, मॅनहोलमध्ये पडून, रस्त्यावरील अपघात अशा विविध दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये गेल्या १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९पर्यंत एकूण १३ हजार १५० अपघाताच्या घटना घडल्या. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांच्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच त्या कुटुंबानं सगळं संपवलं होतं, घरमालक भाडं घ्यायला आले तेंव्हा सगळं समजलं...

अपघातांचे प्रकार                   एकूण घटना           मृत्यू
आग, शॉर्टसर्किट                        ५२५४                 ३८ 
इमारतींचे भाग कोसळणे             १००३                 ५७
झाडे, झाडांच्या फांद्या पडणे        ४९३७                  ८
समुद्र नाले, मॅनहोलमध्ये बुडणे      --                    ६२

179 people lost lives in various Mumbai accidents during a year


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 179 people lost lives in various Mumbai accidents during a year