सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत...

सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत...

मुंबई : मनसेनं पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर अनेक संघटनांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कौतुक केलाय तर अनेक संघटनांनी आणि राजकीय पक्षांकडून मनसेवर जोरदार टीका देखील होतेय. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानंही मनसेवर हिंदुत्वाच्या आणि भगव्या झेंड्याच्या मुद्यांवरून टीका केली होती. मात्र शरद पवारांनी आज राज ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे. राज ठाकरे आणि माझ्यात मतभेद असतील, मात्र मनभेद नाहीत, आमच्यात सुसंवाद आहे. असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

मोठी बातमी - येत्या काळात शरद पवार दिसणार नव्या भूमिकेत, स्वतः पवार म्हणालेत...
 
विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मनसे आघाडीत सामील होईल अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात मनसे आघाडीत गेली नाही. अशातच निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली होती. त्यामुळे शरद पवार अनी राज ठाकरे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र शरद पवारांच्या या विधानामुळे या दोघांमधले संबंध चांगले आहेत असं दिसून येतंय.

मोठी बातमी -  ९० रुपयात विकला जाणाऱ्या मृत्यूला आहे तिथे गाडा...

काय म्हणाले शरद पवार :

"राज ठाकरे आणि माझ्यात मतभेद असतील मात्र मनभेद नाहीत, सुसंवाद आहे. आमचं बोलणं नेहमीच होत असतं. राज ठाकरे यांना मानणारा मोठा  वर्ग आहे, त्यांचं मतांमध्ये परिवर्तन होतं का? याबद्दल शंका आहे. मात्र, राज ठाकरे यांची मतं जाणून घेण्यासाठी लोकं उत्सुक असतात. राज्यात तीन पक्षांचं सरकार तयार झालंय त्यामुळे राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षासाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता ही पोकळी मनसे भरून काढते की भाजप, हे येणारा पुढचा काळचं ठरवेल",असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणालेत.     

sharad pawar made comment on raj thackeray after forming government in maharashtra