दोन महिन्यांपूर्वीच त्या कुटुंबानं सगळं संपवलं होतं, घरमालक भाडं घ्यायला आले तेंव्हा सगळं समजलं...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 February 2020

नवी मुंबई - नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नवी मुंबईतील तळोजा सेक्टर ९ मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापेक्षा भयानक प्रकार म्हणजे, तब्ब्ल दोन महिन्यांपूर्वीच या कुटुंबाने आत्महत्या केल्याची देखील माहिती समोर येतेय. नितेशकुमार उपाध्याय यांनी आपली पत्नी आणि दोन मुलांसह गळफास घेत आत्महत्या केलीये. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

मोठी बातमी - सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत...

गेल्या दोन महिन्यांपासून या कुटुंबातील चार सदस्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडूनही सोसायटीतील रहिवाशांना याचा मागमूस देखील लागला नाही. नितीशकुमार हे सदर घरात आठ महिन्यांपासून राहायला आलेले आहेत. अशात गेल्या दोन महिन्यांपासून नितीश कुमार यांनी भाडं दिलं नव्हतं. डिसेंबर बसून भाडं मिळत नसल्याने घरमालकाने याठिकाणी हजेरी लावली. कुणीही दरवाजा न उघडल्याने आपल्या जवळीत डुप्लिकेट चावीने त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांना धक्का बसला. नितीश कुमार त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी यांचे कुजलेले मृतदेह त्यांना घरात आढळले.  

मोठी बातमी - येत्या काळात शरद पवार दिसणार नव्या भूमिकेत, स्वतः पवार म्हणालेत...

दरम्यान, याप्रकरणी आता नवी मुंबईच्या तळोजा पोलिसांमार्फत तपास सुरु आहे. तळोजा सेक्टर ९ मधील शिव कॉर्नर जवळील सोसायटीटाळ्या धक्कादायक आत्महत्या प्रकरणानंतर सोसायटीतील सभासद आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना धक्का बसलाय.  

two month back family from navi mumbai took extreme step but neighbor were totally unaware 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two month back family from navi mumbai took extreme step but neighbor were totally unaware