यशस्वी लढा ! 'या' जिल्ह्यातील 18 जण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

मुंबई, नवीमुंबईत कोरोनाचा उद्रेक होत असताना रायगड जिल्ह्यातून दिलासा देणारी बातमी आली आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 58 कोरोनाबाधितांपैकी 18 रुग्णांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे.

अलिबाग : मुंबई, नवीमुंबईत कोरोनाचा उद्रेक होत असताना रायगड जिल्ह्यातून दिलासा देणारी बातमी आली आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 58 कोरोनाबाधितांपैकी 18 रुग्णांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. कोरोनातून बरे झालेल्या या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

नक्की वाचा : 'एसटी'चा काखेत कळसा आणि गावाला वळसा; थर्मल मशीनच्या वापराबाबत महिनाभरानंतर आली जाग...

रायगड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 38 रुग्ण असून त्यातील चार जण वगळता उर्वरित सर्वांची प्रकृती उत्तम आहे. पनवेल महापालिका वगळता उर्वरित जिल्ह्यात कोरोनाचा फारसा प्रभाव दिसून येत नसल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे. अन्य बाधित रुग्णांचाही क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत आहे, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा जिल्हा प्रशासनाला आहे. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील 14 तर रायगड ग्रामीणमधील 4 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 38 जणांवर मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील 25, पनवेल ग्रामीण 2, उरण 4, श्रीवर्धन 5, पोलादपूर 1 आणि कर्जतमधील एकाचा समावेश आहे.

हे ही वाचा : लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून १५ कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलेव्हरी बॉय

बुधवारी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे येथील एका महिलेला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात इतरत्र एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यातील 14 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी

 

18 persons from Raigad Successful fight against Corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 persons from Raigad Successful fight against Corona