esakal | लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून १५ कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलेव्हरी बॉय
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून १५ कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलेव्हरी बॉय

सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. त्यात बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड बोर होतंय. काही लोक घरून काम करतायत तर काही लोकांना पूर्णपणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाच एका व्यक्तीनं लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून चक्क  डिलिव्हरी बॉयचं काम सुरु केलंय.

लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून १५ कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलेव्हरी बॉय

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. त्यात बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड बोर होतंय. काही लोक घरून काम करतायत तर काही लोकांना पूर्णपणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाच एका व्यक्तीनं लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून चक्क  डिलिव्हरी बॉयचं काम सुरु केलंय.

डिलिव्हरी बॉय झालेला हा व्यक्ती एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. ३८ वर्षांच्या या उद्योगपतीचं नाव Sergey Nochovnyy असं आहे. मात्र आता तुम्हाला वाटत असेल कि सर्जीला व्यवसायात तोटा झाल्याने तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायला लागला की काय?  मात्र असं नाहीये. त्याला चक्क लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून त्यानं हे काम सुरू केलं आहे.

निर्णय झालाय, 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू... 

सर्जीची स्वत:ची कंपनी आहे. या कंपनीचा २ मिलियन डॉलर्सचा व्यवसाय आहे. त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल १५ कोटी इतकी आहे. सर्जीनं आपला व्यवसाय हळूहळू वाढवल्यानंतर तो मॉस्कोमध्ये आला. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्जी घरातून काम करत होता. मात्र १५ दिवसांनंतर सर्जीला कंटाळा आला. त्यामुळे त्यानं २० किमी चालत सामान आणि अन्न यांची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला.

सामान पोहोचवताना व्यायामही होईल या उद्देशानं तो डिलिव्हरओ बॉय झाला.  त्याला रोज १५-२० डॉलर मिळतात. मुळात सर्जी हे काम पैसे कमवण्यासाठी नाही तर नवा अनुभव मिळवण्यासाठी करत आहे असं त्याचं म्हणणं आहे. यामुळे आता इतका मोठा व्यावसायिक लोकांच्या घरोघरी जाऊन फूड डिलिव्हरी करतो आहे. हा व्यावसायिक रशियातील आहे.

मोठी बातमी - महाविकास आघाडीतील 'एका' मंत्र्याची तब्येत बिघडली, कोरोना टेस्ट रिपोर्ट येणं बाकी..

business man become delivery boy because he was bored during lockdown 

loading image
go to top