Mumbai Crime : मुंबई विमानतळावर 18 सुदानी महिलांना सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक

Gold
Gold

Mumbai : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबई विमानतळावर 18 सुदानी महिला आणि एका भारतीयाला सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडे पेस्ट स्वरूपात 16.36 किलो सोने सापडले. ज्याची किंमत 10.16 कोटी रुपये आहे.

Gold
Mumbai : खळबळजनक! पत्नीशी झालेल्या वादानंतर मुलीला फासावर लटकवून स्टॉकब्रोकरने उचललं टोकाचं पाऊल

24 एप्रिल रोजी यूएईहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सिंडिकेटद्वारे पेस्ट स्वरूपात सोन्याची भारतात तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने विमानतळावर पाळत ठेवली होती.

तीन फ्लाइट्समधील सिंडिकेटचा भाग असल्याचा संशय असलेल्या प्रवाशांना विमानतळावर डीआरआयच्या पथकाने ओळखले आणि त्यांना रोखले. त्यांची झडती घेतल्यानंतर डीआरआयने पेस्ट स्वरूपात 16.36 किलो सोने जप्त केले, ज्याची एकूण किंमत 10.16 कोटी रुपये आहे.

जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने संशयित प्रवाशांच्या अंगावर लपवून ठेवलेले आढळले आढळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com