ठाण्यात कारमधून 19 लाख हस्तगत

Money
Money
ठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक विभागाच्या दक्षता पथकाने एका कारमधून तब्बल 19 लाखांची रक्कम हस्तगत केली आहे. बुधवारी (ता. 17) सायंकाळी कोलशेत रस्त्यावर सॅन्डोज बाग, लोढा इमारतीनजीक तपासणीदरम्यान थांबवलेल्या एका खासगी कंपनीच्या कारमध्ये पाचशे रुपयांची तीन बंडले अशी 19 लाखांची रोकड आढळली. या रकमेबाबत कारचालक दुर्गेश नाडकर्णी यांना समाधानकारक खुलासा करता न आल्याने ही रक्कम जप्त करून कापूरबावडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही कार मृत्युंजयी कंपनीची असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com