अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्र्यांकडून आमदारांना स्पेशल गिफ्ट

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्र्यांकडून आमदारांना स्पेशल गिफ्ट

मुंबई: गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. त्यात राज्यावर आर्थिक संकटची घडी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या पगारात ३० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र आता आमदारांचे वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाचं संकट पाहता सुरुवातीच्या काळात राज्यात सर्वपक्षीय आमदारांचं वेतन ३० टक्क्यांनी कमी करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वच आमदारांना ७० टक्के वेतन मिळत होतं. मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय आमदारांना एक खूशखबर दिली आहे. आमदारांचं वेतन १ मार्चपासून पुन्हा पूर्ववत केलं जाईल. आमदारांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याची घोषणा अजित पवारांनी विधानसभेत केली आहे.

तसंच आता आमदारांचा निधी 4 कोटी करण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यावेळी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडताना अर्थमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.  यावेळी अजित पवार यांनी जाहीर केलं की, १ मार्चपासून सर्व आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षभर आमदारांनी ३० टक्के वेतन सोडलं होतं. करोना काळात या प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हे वेतन पूर्ववत केलं जाईल.

तसंच अजित पवारांनी आमदार निधीमध्ये देखील वाढ केल्याचं जाहीर केलं. अर्थमंत्री म्हणाले की, कोरोना काळात स्थानिक विकास निधीला कट लावलेला नाही. शेवटच्या काळात ३ कोटी रुपये आमदार निधीदेखील सगळ्यांना देण्याची सोय केली. सरकार कुणाचंही असलं, तरी आमदार निधी सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट असलं, तरी आमदार निधी ४ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपये जातील, मात्र, त्याची तरतूद केली जाईल.

From 1st march no salaries cut of mla Ajit Pawar announcement

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com