माथाडी कामगारांकडून पूरग्रस्तांना ६० लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी माथाडी कामगारांच्या मजुरीतून तब्बल ६० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी हा धनादेश सुपूर्द केला. 

नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी माथाडी कामगारांच्या मजुरीतून तब्बल ६० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी हा धनादेश मंगळवारी (ता. १३) सुपूर्द केला. याप्रसंगी कामगार मंत्री संजय कुटे उपस्थित होते.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नवी मुंबईतील महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या कार्यकर्त्यांची माथाडी भवनमध्ये १० ऑगस्टला विविध माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे मुकादम, उपमुकादम, कार्यकर्ते, वारणार-मापाडी व पालावाला महिला आणि जनरल विभागातील कार्यकर्ते यांची सभा आयोजित केली होती. त्या सभेत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माथाडी कामगार युनियनतर्फे ५० लाख रुपये आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढीतर्फे १० लाख रुपये मदतनिधी देण्यात आला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 lakh assistance to flood victims from Mathadi workers