मुंबईहून अलिबागमध्ये आलेले आणखी 2 जण कोरोनाबाधित, प्रशासनाची धावपळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

मुंबईतील खार येथून अलिबाग तालुक्यातील सुडकोली तसेच भुवनेश्‍वर-नारंगी येथे आलेल्या काहींना त्रास जाणवू लागल्याने त्यांना अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अलिबाग : तालुक्यातील सुडकोली तसेच भुवनेश्‍वर-नारंगी येथे मुंबईतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे यांनी दिली. या रुग्णांमुळे आतापर्यंत तालुक्यात आढळलेल्या संसर्गित रुग्णांची संख्या 10 वर जाऊन पोहचली आहे.

महत्वाची बातमी : कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

दोन दिवसांपूर्वी या रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. शनिवारी (ता. 23) सायंकाळी आलेले रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. मुंबईतील खार येथून अलिबाग तालुक्यातील सुडकोली तसेच भुवनेश्‍वर-नारंगी येथे आलेल्या काहींना त्रास जाणवू लागल्याने त्यांना अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेऊन ते मुंबईत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

नक्की वाचा : कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर

रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेल्या दोन्हीही महिला आहेत. त्यांना अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. अभिजीत घासे यांनी दिली. 

2 more people from Mumbai to Alibag are corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 more people from Mumbai to Alibag are corona positive