Mumbai News : मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी 20 कोटींचा निधी

आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश
Mumbai News
Mumbai Newsesakal
Updated on

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात ‘मूलभूत सोयीसुविधांचा विकास` या योजनेंतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या योजनेंतर्गत 10 कोटींच्या निधीतून नालासोपारा मतदारसंघातील पाच कामे मार्गी लागणार आहेत. यात प्रभाग समिती ‘अ`मधील कै. भास्कर ठाकूर मंडई येथे बहुद्देशीय इमारत बांधणे, प्रभाग समिती ‘बी` विरार (पू.) आरक्षण क्रमांक 115 येथे नाना-नानी पार्कजवळ रुग्णालय (आरोग्य केंद्र बांधणे), प्रभाग समिती ‘अ` मौजे बोळिंज सर्व्हे क्रमांक 400 मध्ये बहुद्देशीय इमारत बांधणे, प्रभाग समिती ‘अ` विरार (पू.) येथील सर्व्हे क्रमांक 401 मध्ये बहुद्देशीय इमारत बांधणे आणि प्रभाग समिती ‘डी` नालासोपारा येथील आरक्षण क्रमांक 437 येथे स्पोर्टस कॉम्प्लेक्स-इंडो अरगेम बांधणे इत्यादी महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

Mumbai News
Nashik News : बालरोग तज्ज्ञांची ‘नाशिकॉन’ शनिवारपासून; राज्यस्तरीय परिषदेत सहाशे डॉक्टरांचा सहभाग

राज्यातील महानगरपालिका मूलभूत सोयीसुविधांचा विकास करण्याच्या कामासाठी अनुदान देण्यात येते. सदर योजनेचे सुधारित निकष व मार्गदर्शक तत्त्वे शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेली आहेत. या योजनेंतर्गत नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मूलभूत सोयीसविधांचा विकास करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनंती आमदार क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ऑगस्ट 2023 मध्ये केली होती. त्यानुसार; नगरविकास विभागाने आमदार क्षितिज ठाकूर यांनी सूचविलेल्या कामांकरता 10 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे.या प्रकल्पांतर्गतची कार्यान्वय यंत्रणा महानगरपालिका असणार आहे. सदर प्रकल्प खर्चाचा 100 टक्के हिस्सा राज्य शासनाचा आहे. त्यामुळे सदर प्रकल्पांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांना तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्याची खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांनी करून घेतल्यानंतर या कामांना प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. दरम्यान; विरार (प.) डोंगरपाडा येथे आरक्षण क्रमांक 194 येथे अभ्यासिका इमारत बांधणे, प्रभास समिती ‘ए`मधील डोंगरपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रालगत बालोद्यान विकसित करणे, आचोळे तलाव येथे आरसीसी रिटेनिंग वॉल बांधणे, प्रभाग समिती ‘एफ` बिलालपाडा येथे बहुद्दशीय इमारत बांधणे, आरक्षण क्रमांक 316 येथे मार्केट व बहुद्देशीय इमारत बांधणे, प्रभाग समिती ‘डी` वसंत नगरी येथील मैदानाचा विकास करणे इत्यादी अन्य कामांचाही प्रस्ताव आमदार क्षितिज ठाकूर यांनी या योजनेंतर्गत निधी उपलब्धतेकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेला आहे.

विशेष म्हणजे; वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही याच योजनेंतर्गत काही कामे प्रस्तावित केलेली आहेत. या प्रभाग समिती ‘जी` नायगाव पूर्व जूचंद्र सर्व्हे नंबर 389/4 येथे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधणे, प्रभाग समिती ‘जी` कामण येथे पिराचा तलाव विकसित करणे, प्रभाग समिती ‘डी` नवघर पूर्व येथील स्वागत उद्यान विकसित करणे, प्रभाग समिती ‘डी` नवघर पूर्व आरोग्य केंद्रासमोरील जागेत मार्केट विकसित करणे आणि प्रभाग समिती ‘जी` नायगाव-वडवली येथील मार्केटचे नूतनीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. याकरताही शासनाने 10 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे. अशा पद्धतीने या एकत्रित कामांना 20 कोटी इतका निधी प्राप्त होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.