पालीजवळ एसटी बस अपघातात २० विद्यार्थी जखमी

महेश पवार
गुरुवार, 16 जानेवारी 2020

20 विद्यार्थ्यांसह 26 जखमी 

नागोठणे : पेण-पाली एसटी बसला आज सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बस मधील 26 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये पाली येथील शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयाच्या 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना वाकण-पाली रस्त्यावरील वाकण जवळच्या धोकादायक वळणावर घडली. 

हे वाचा : प्रदुषणाने बेजार, पाताळगंगा नदीची व्यथा

नागोठणे स्थानकांतून सकाळी 8 वाजता निघालेली पेण आगाराची एसटी. बस वाकण येथील वाकण नाक्‍याच्या पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या वळणावर आली असताना पालीकडून येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने एसटीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातात गंभीर जखमी झालेला ट्रक चालक मुरलीधर देशमुख, (रा. खोपोली) आणि रेश्‍मा खाडे (रा. तरशेत) यांना पुढील उपचारासाठी तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. अन्य जखमींमध्ये एसटी वाहक पूजा नितीन म्हात्रे (रा. पेण) दत्ताराम मोरे (रा. शिळोशी), राणी माने, गृहती डाकी, प्रज्वल घासे, प्राजक्ता डाकी (सर्व रा. शेतपळस) प्रिया गदमळे, स्नेहा पाटील, प्रियांका मोकल (रा. शिहू), प्रिया भोईर, हर्षाली बडे (रा, कोलेटी), जय नावले, साहिल जंगम (रा. बाळसई), भाविका मढवी(रा. निडी), हेमा पिंगळा (रा.गंगावणे), नितेश सुतार (रा. मेढा), शशिकांत चौगले (पांडापूर), अंजली जाधव (रा. नागोठणे) ललिता जांभळे (रा.पळस), किरण माडेर, त्रिवेणी पाटील व हर्षाली मलत यांचा समावेश आहे. 

हे वाचा :मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं! 

बहुतांश जखमींवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात; तर तीन जखमींवर कोकणे हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर काही जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 students injured in ST bus accident