बदलापूरमध्ये 207 किलो गांजा जप्त; तिघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

बदलापूर - याच आठवड्यात बदलापुरातील कारखान्यातून सात कोटींचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने 207 किलो गांजा जप्त केला आहे. यासह तस्करांच्या दोन अलिशान गाड्या, असा एकूण 68 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त डॉ. प्रदीप दिघावकर यांनी दिली. यातील तिघांना अटक झाली असून, मुख्य आरोपी फरार आहे.

कल्याण प्रादेशिक विभागाचे विशेष पथक आणि बदलापूर पोलिसांच्या मदतीने बदलापुरातून गांजा विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे. कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळातील बेकायदा अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी पोलिस आयुक्त डॉ. प्रदीप दिघावकर यांनी विशेष पथकाची नेमणूक केली होती. दरम्यान, या पथकाला बदलापूर पश्‍चिम बसस्थानकावर गांजा विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांनी नरेश अहिरे या तरुणाला दोन किलो 200 ग्रॅम गांजा विकताना अटक केली.

Web Title: 207 kilo ganja seized crime