बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यास २१ महिन्यांची शिक्षा

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यास २१ महिन्यांची शिक्षा
बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यास २१ महिन्यांची शिक्षा

नवी मुंबई : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी विकास जाधव या आरोपीला नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दि. दि. कोळपकर यांनी २१ महिने २७ दिवस सश्रम कारावास आणि १०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील दुसरा आरोपी अटकेनंतर जामीन घेऊन फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

आरोपी विकास जाधव आणि त्याचा सहकारी या दोघांना जानेवारी २०१३ मध्ये बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी अटक केली होती. त्या वेळी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोन्ही आरोपींविरोधात सीबीडी बेलापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या वेळी नंदू जाधव हा वर्षभर जेलमध्ये होता; मात्र त्याचा सहकारी जामीन मिळवून बाहेर आला. त्यानंतर नंदू याला डिसेंबर २०१३ मध्ये पी.आर.बॉन्डवर मुक्त करण्यात आले; मात्र त्यानंतर तो न्यायालयात हजर न झाल्याने त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्याला नोव्हेंबर २०१८ मध्ये पुन्हा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. 

यादरम्यानच्या कालावधीत जेलमध्ये असलेल्या नंदूने स्वेच्छेने गुन्हा कबुल केल्यानंतर सीबीडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दि. दि. कोळपकर यांनी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी विकास जाधव याला भारतीय हत्यार कायद्यानुसार दोषी ठरवून, त्याला २१ महिने २७ दिवस सश्रम कारावास आणि १०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपी नंदू जाधव हा २०१३ मध्ये अंडर ट्रायलवर आरोपी असल्याने तसेच तो नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याला सदर कालावधीकरिता शिक्षेत सूट देण्यात आली. या खटल्यात सहायक सरकारी वकील आर. आर. अग्रवाल यांनी काम पाहिले. या गुन्ह्यातील जामीन घेऊन फरारी झालेला दुसरा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने त्याच्याविरोधात प्रोक्‍लामेशन जारी करण्यात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com