शहरात २१ जणांची मालमत्ता जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

नवी मुंबई - महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्या नागरिकांविरोधात पुन्हा मालमत्ता कर विभागाने कारवाईचा बडगा सुरू केला आहे. मालमत्ता कर विभागाने केलेल्या कारवाईत एक लाख रुपयांपेक्षा जास्त कर थकविणाऱ्या २१ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, तर एक हजार ७१७ नागरिकांना ४८ तासांमध्ये थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याची नोटीस बजावली आहे. 

महापालिकेने सीबीडी-बेलापूर, वाशी, नेरूळ, सानपाडा, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली आणि ऐरोली भागात कारवाई करून २२ जणांच्या मालमत्तेला सील ठोकून जप्तीची कारवाई केली. या २२ जणांनी गेल्या अनेक वर्षांपासून २२ कोटी १६ लाख ५३ हजार ७४६ रुपये थकविले होते. त्यांना वारंवार नोटीस देऊन कराचा भरणा न केल्याने अखेर महापालिकेने त्यांची मालमत्ता जप्त केली. मोकळे भूखंड असताना त्या वेळपासून त्या मोकळ्या भूखंडावर इमारत उभी राहिल्यानंतरही मालमत्ता कर भरले नसल्याचे महापालिकेला निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने संबंधितांना काही दिवसांपूर्वीच मालमत्ता कर भरण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या.   

मोठ्या कंपन्यांना नोटीस
सीबीडी बेलापूरमधील रामा पेट्रोकेमिकलसह एस. के. व्ही. इंडस्ट्रीयल प्लांट ॲण्ड ट्रीटमेंट, नेरूळमधील महात्मा फुले ट्रस्टसह चार, कोपरखैरणे येथील हिंदू विद्याभवन, घणसोलीतील बॅंक ऑफ इंडिया व जनाधार शिक्षण प्रसारक संस्थांसह २२ जणांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Web Title: 21 seized assets