217 जणांचे मुंबईतील हक्‍काच्या घराचे स्वप्न पूर्ण 

217 जणांचे मुंबईतील हक्‍काच्या घराचे स्वप्न पूर्ण 

मुंबई - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) रविवारी मुंबईतील 217 घरांची सोडत काढली. या सोडतीत राशी कांबळे या पहिल्या; तर दीनानाथ नवगिरे हे दुसरे विजेते ठरले. विशेष म्हणजे म्हाडाच्या दोन कर्मचाऱ्यांचेही घराचे स्वप्न पूर्ण झाले. 

या घरांसाठी 66 हजार अर्ज आले होते. एकेका घरासाठी तीनशेहून अधिक अर्ज आले होते. सकाळी 10 वाजता वांद्रे येथील म्हाडा भवनात सोडतीला सुरुवात झाली. दरवेळी सोडतीचे निकाल पाहण्यासाठी अर्जदारांची घाई सुरू असते. एकेक निकाल जाहीर होताच विजेते व्यासपीठावर येताना त्यांचे जंगी स्वागत होते. यंदा मात्र दोघेच जण व्यासपीठावर आले. 

म्हाडा प्रवर्गातील विजेते सोडल्यास सर्वसामान्य प्रवर्गातील विजेते अनुपस्थित होते. सोडतीसाठी मंडपात तीन स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, पालकमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत आणि सभापती मधू चव्हाण या वेळी उपस्थित होते. बऱ्याच जणांनी घरीच बसून म्हाडाच्या http://mhada.ucast.in वर सोडतीचे प्रक्षेपण पाहणे पसंत केले. 

सोडतीमधील यशस्वी अर्जदार व प्रतीक्षा यादीतील नावे http://lottery.mhada.gov.in आणि http://mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. 

म्हाडाचा कर्मचारी असूनही मुंबईत स्वतःचे घर नव्हते. सलग पाच वेळा अर्ज भरत होतो, पण घर लागत नव्हते; मात्र यंदा माझे घराचे स्वप्न पूर्ण झाले. हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. 
- प्रशांत गायकवाड, विजेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com