मुंबईतील लोकल ट्रेनमधील 'इतके' लाख प्रवासी घटले... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

कामावर जाणाऱ्यांची सर्वाधिक कमी संख्या; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद 

मुंबई - मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर सुमारे 80 लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करतात; मात्र 18 मार्च रोजी या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाल्याचे दिसून आले. सुमारे 22 लाख प्रवासी घटले असून मध्य रेल्वे मार्गावर 32 लाख 36 हजार 75 प्रवाशी; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावरून 26 लाख 29 हजार 974 प्रवाशांची नोंद झाली आहे. 

कठीण आहे ! कोरोना घेऊनच 'तो' गेलेला लग्न समारंभाला; १००० नागरिकांच्या संपर्कात आल्याचा संशय

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या लोकलमधील प्रवाशांनी अत्यावश्‍यक असल्यास घराबाहेर पडा, गर्दीचे ठिकाण टाळा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद दिल्याने लोकल रेल्वे मार्गावरील गर्दी ओसरून सुमारे 22 लाख प्रवाशांची घट झाली आहे. कोरोना विषाणूची बाधा टाळण्यासाठी प्रवाशांकडून अतिरिक्त प्रवास टाळला जात आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये दोन्ही रेल्वे मार्गांवर दैनंदिन सुमारे पाच ते 10 लाख प्रवाशांची संख्या कमी झाली असून, त्यामुळे नागरिकांकडूनही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असल्याचे दिसून आले आहे. 

कठीण आहे !  स्वतःची आई ICU मध्ये तरी आरोग्यमंत्री झटतायत महाराष्ट्रासाठी..

प्रवाशांत 50 टक्के घट 

11 मार्च रोजी मध्य रेल्वे मार्गावर 67 लाख 68 हजार 754 प्रवाशांनी; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर 55 लाख 40 हजार 247 प्रवाशांनी प्रवास केला होता. त्या तुलनेत बुधवारी (ता. 18) मध्य रेल्वे मार्गावर 32 लाख 36 हजार 75 प्रवाशांनी; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावरून 26 लाख 29 हजार 974 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे या नऊ दिवसांत प्रवाशांमध्ये 50 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. 

22 lacs of mumbai local train travelers reduced effect of corona on mumbaikar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 lacs of mumbai local train travelers reduced effect of corona on mumbaikar