स्वतःची आई ICU मध्ये तरी आरोग्यमंत्री झटतायत महाराष्ट्रासाठी..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

मुंबई: कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रात झाला आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र या सगळ्यात एक व्यक्ती सतत राज्याच्या जनतेला माहिती देण्याचं आणि कोरोनाला राज्यात येण्यापासून रोखण्याचं काम करत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे. राजेश टोपे यांच्या मातोश्री गेल्या २० दिवसांपासून रुग्णालयात मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटताना पाहायला मिळतायत.  

 हेही वाचा: मुंबईला आजपासून परदेशी प्रवाशांचे आव्हान

राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांना महाराष्ट्रात कोरोना पसरू नये यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. राजेश टोपे यांनी आज एअरपोर्टवर जाऊन प्रवाशांच्या स्क्रीनिंग व्यवस्थेची पाहणी केली. राजेश टोपे वेळोवेळी माध्यमांशी संपर्क साधत आहेत. पत्रकार परिषद घेत आहेत. रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून माहिती घेत आहेत. कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांची पाहणी करत आहेत. तसंच ते राज्याच्या जनतेला योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. मात्र या सगळ्यात स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठीही राजेश टोपे यांच्याकडे वेळ नाहीये. स्वतःची आई रुग्णालयात असूनही त्यांना आपल्या आईच्या प्रकृतीची विचारणा करायला पुरेसा वेळ मिळू शकत नाहीये.   

हेही वाचा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी दिलेत मनसैनिकांना 'हे' आदेश... म्हणालेत.. 

बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींवर उपचार सुरु आहेत. मात्र राज्यभरात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका,आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषद अशा व्यस्त वेळापत्रकामुळे राजेश टोपे यांना त्यांच्या मातोश्रींना पुरेसा वेळ देता येत नाहीये. मात्र राजेश टोपे महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करून झटत आहेत. 

हेही वाचा: गो कोरोना गो साठी थाई मसाजचा पर्याय;लोकांच्या भीतीचं 'असं'ही भांडवल 
 
याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने राजेश टोपे यांना प्रश विचारला. यावर उत्तर देताना राजेश टोपे यांनी शरद पवार यांचं उदाहरण दिलंय. "शरद पवार यांनी किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी केलेलं काम माझ्यासाठी आदर्श आहेत " असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हंटलंय. 

Health minister Rajesh topes mother admitted to hospital since last 20 days but he is on work for maharashtra 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health minister Rajesh topes mother admitted to hospital since last 20 days but he is on work for maharashtra