कठीण आहे ! कोरोना घेऊनच 'तो' गेलेला लग्न समारंभाला; १००० नागरिकांच्या संपर्कात आल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

मुंबई - कल्याणमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची झोप उडवली आहे.  याला कारणही तसंच आहे. कल्याणमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सोलापुरात एका लग्नाला जाऊन आल्याची माहिती आता समोर येतेय. या पेशंटच्या माध्यमातून कुणाला संसर्ग झालाय का याची माहिती घेण्यासाठी एक टीम देखील नियुक्त करण्यात आली आहे. अधिकृत अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जवळ-जवळ १००० लोकांच्या संपर्कात आल्याची भीती व्यक्त केली जातेय. आज दिनांक १९ मार्च संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कल्याणमधील तिघांना कोरोनाची लागण झालीये.   

मोठी बातमी - जरा ऐका आणि चुपचाप घरात राहा ! होम क्वारंटाईनचा शिक्का घेऊन प्रवास करणारे आणखी सहा पकडले

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माहितीनुसार कल्याणमधील पॉझिटिव्ह रुग्ण सहा मार्चला अमेरिकेतून मुंबई विमानतळावर दाखल झाला. मुंबई विमानतळावरून या इसमाने कल्याणासाठी टॅक्सी बुक करून प्रवास केला होता. त्याच दिवशी त्यांनी कळ्यांमधून हुतात्मा एक्सप्रेसने प्रवास केला. यानंतर सोलापुरात जाऊन या इसमाने एक लग्न समारंभात देखील हजेरी लावली होती. यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुणे आणि सोलापूर महानगरपालिकेला या सर्व बाबतीत सूचित केलंय. सदर इसम कुणा-कुणाच्या संपर्कात आलाय याची माहिती घेणं सध्या सुरु आहे.

सदर इसम ६ तारखेला मुंबईत आला. या इसमाला ९ तारखेपासून सर्दी, खोकला, कफ अशी COVID19 ची लक्षणं दिसायला लागलीत. यानंतर सदर रुग्णाची कस्तुरबात तपासणी झाल्यानंतर हा इसम पॉझिटिव्ह आढळला. या रुग्णामुळे त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीला COVID19 चा संसर्ग झालाय. 

मोठी बातमी - "भोंगा वाजलाय, वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरु" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने लिहिलेल्या पत्राची सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल घेतली गेलीये. कल्याणमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लग्नादरम्यान कुणाकुणाला भेटला माहिती घेण्यासाठी १० विविध टीम्स सध्या कार्यरत असल्याची माहिती सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या प्रत्येक टीममध्ये पाच जणांचा समावेश आहे. या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीत  सध्यातरी यापैकी कुणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचं पुढे येतंय. 

kalyan corona positive patient traveled to solapur to attained wedding ceremony

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalyan corona positive patient traveled to solapur to attained wedding ceremony