'ब्ल्यू बॉटल्स'चा 22 जणांना दंश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुंबई - मालाडच्या आक्‍सा बीचवर सलग दुसऱ्या दिवशी रविवारीही पर्यटकांना ब्ल्यू बॉटल्स या सागरी जिवांचे दंश झाले. सुरक्षारक्षकांना न जुमानता पाण्यात गेलेल्या 22 अतिउत्साही पर्यटकांवर ही वेळ आली. हा आकडा रात्री उशिरापर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे.

सकाळी पाण्यात उतरलेल्या पाच पर्यटकांनी दंश झाल्याची तक्रार केली. सुरक्षारक्षकांनी त्यांना पाण्यात न जाण्याची विनंती केली होती; परंतु "आम्ही आमची काळजी घेऊ,' असे उलट उत्तर त्यांनी दिले होते. दंश होताच हे पाचही पर्यटक पाण्याबाहेर आले.

शनिवारच्या घटनेनंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आक्‍सा समुद्र किनाऱ्यावर गस्त वाढवली होती. दुपारी 3 वाजता 108 क्रमांकाची रुग्णवाहिकाही तेथे पोहोचली. या रुग्णवाहिकेतील डॉक्‍टरांनी "ब्ल्यू बॉटल्स'चा दंश झालेल्या काही पर्यटकांना इंजेक्‍शनही दिले. बहुतांश जणांवर मलमपट्टीचा उपचार करण्यात आला. आक्‍सा बीचपाठोपाठ रविवारी वर्सोवा किनाऱ्यावरही "ब्ल्यू बॉटल्स' दिसून आले.

Web Title: 22 peoples bites by blue bottles