
मुंबई : दरडींच्या छायेत मुंबईतील सुमारे २२ हजार झोपड्या असल्याची बाब समोर आली आहे. दरडींलगत संरक्षक भिंती बांधण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची अनास्था असल्याने हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यातच पावसाळ्यात येथील नागरिकांना मोठ्या दुर्घटनेची भीती सतावत आहे.