जुन्या एक हजारांच्या 23 लाखांच्या नोटा हस्तगत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

ठाणे ः भारतीय चलनातून बाद झालेल्या जुन्या एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या फिरोज इसुफ अन्सारी (45) याला ठाण्यात अटक करण्यात आली. अन्सारी हा खासगी शिकवणीत शिक्षक म्हणून शिकवत असून ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला शनिवारी (ता.8) रात्री कोरम मॉलसमोरील सर्व्हिस रोडवर सापळा रचून अटक केली.

हेही वाचा - मोदींची पुन्हा तुलना छत्रपतींशी

त्याच्याकडून 23 लाख रुपये किमतीच्या एक हजार रुपयाच्या 2300 जुन्या नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह कोरम मॉल समोरील सर्व्हिस रोडवर सापळा रचला होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास पाठीवर बॅग घेऊन अन्सारी आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. तेव्हा, त्याच्या पाठीवरील बॅगमध्ये चलनातून बाद झालेल्या एक हजारांच्या तब्बल 2300 जुन्या नोटा आढळून आल्या.

महत्त्वाची बातमी - ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टाॅयलेटमघलं पाणी

पोलिसांनी या सर्व नोटा जप्त करीत त्याला अटक केली. अन्सारी हा मुंबईच्या साकीनाका येथील मोहली व्हिलेज परिसरात वास्तव्यास असून तो खासगी शिकवणी घेत होता. त्याने या जुन्या नोटा कुठून आणल्या व या नोटांचे नक्की काय करणार होता, याचा अधिक तपास गुन्हे शाखा करीत आहे. 

भारतीय चलनातून बाद ठरवण्यात आलेल्या एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपून गेली असतानाही अशा प्रकारे नोटा बदलण्याच्या रॅकेटमागे नेमके कोण आहे, याचा आम्ही छडा लावत आहोत. 
- नितीन ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा 

web title : 23 lakh notes of old one thousand seized

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 lakh notes of old one thousand seized