मुंबईत 23 विभागात रुग्ण दुपटीचा दर 100 दिवसांच्या वर

मुंबईत 23 विभागात रुग्ण दुपटीचा दर 100 दिवसांच्या वर

मुंबई: मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 132 दिवसांवर गेला आहे. 24 विभागांपैकी 23 विभागातही हा कालावधी 100 दिवसांच्या वर गेला आहे. फक्त आर दक्षिणमध्ये रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 97 दिवस इतका आहे. एफ दक्षिण विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल  256 दिवसांवर गेला आहे. या विभागात रूग्ण वाढीचा सरासरी दरही 0.27% असा आहे.


मुंबईत सोमवारी 804 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,52,087 झाली आहे. मुंबईत काल 37 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,099 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 1,293 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,21,458 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 132 दिवसांवर गेला आहे. तर 25 ऑक्टोबर पर्यंत एकूण 14,56,838  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.53 इतका आहे.

मुंबईत 622 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 8,400 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 7,903 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 965 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

मुंबईत सोमवारी नोंद झालेल्या 32 मृत्यूंपैकी  जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 23 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 37 रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते. 9 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 27 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

------------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

In 23 wards in Mumbai rate of patient doubling is above 100 days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com