वसई-विरारमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 25 कोरोनाबाधित; पोलिस, परिचारिका, बँक कर्मचारी यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह शहरात एकूण 25 जण कोरोनाबाधित आढळले असून, आठ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

वसई : वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह शहरात एकूण 25 जण कोरोनाबाधित आढळले असून, आठ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

महत्वाची बातमी कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

आतापर्यंत एकूण 219 जण कोरोनामुक्त झाले असून, 199 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये पोलिस, परिचारिका, बँक कर्मचारी असून अन्य अतिजोखमीच्या संपर्कात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

25 corona positive in Vasai-Virar; Including police, nurses, bank employees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 corona positive in Vasai-Virar; Including police, nurses, bank employees