बापरे ! धारावीत नवे 25 कोरोना रुग्ण. कोरोनाची ही चेन तुटणार तरी कधी ? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

कोरोना बाधितांची संख्या 214 वर; 13 जणांचा मृत्यू

मुंबई, ता. 23 : राज्यासह मुंबईत कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना धारवीमध्येही रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. गुरुवारी धारावीमध्ये नवे 25 कोरोना रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची संख्या 214 झाली आहे. 25 नव्या रुग्णांपैकी 19 पुरुष आणि  6 महिला आहेत. त्यातील 16 रुग्ण तरुण आहेत; तर शास्त्रीनगर मधील एका 69 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. धारावीतील मृतांचा आकडा 13 वर पोहोचला आहे. 

धारावीसहदादर आणि माहिम परिसरातही कोरोनाबाधित सापडले. दादर येथील पोलिस कॉलनीतील 29 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दादरमधील बाधितांची संख्या 28 झाली आहे; तर महिममध्ये 6 नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 24 झाली आहे. माहिममध्ये गुरुवारी एका रुग्णाचा मृत्यू  झाला. पालिकेकडून नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

केंद्रीय  बैठकांनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेत 'हे' अत्यंत महत्त्वाचे निर्देश...

3 मे नंतर लॉक डाऊन उठला तरीही पाळावेच लागतील 'हे' नियम, कारण कोरोनाची टांगती तलावर डोक्यावर असेल

मेल्यानंतरही सोसाव्या लागतायत मरणयातना; कूपर रुग्णालयातील डोळ्यात पाणी आणणारा प्रकार...

#PPE किट घातल्याने सहा सहा तास पाणीही पिता येत नाहीत हो, घामाची अंघोळ होते; वाचा कोरोना वॉरियर्स कसे काम करतायत..

मोठी बातमी - ऐन लॉक डाऊनमध्ये आता पोलिसांच्या बदल्या... 

कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं ? जाणून घ्या...

25 new covid positive patients detected in dharavi read full story
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 new covid positive patients detected in dharavi read full story