रेल्वेत नोकरीच्या नावाने 25 जणांची फसवणूक 

रेल्वेत नोकरीच्या नावाने 25 जणांची फसवणूक 

मुंबई - रेल्वेत तिकीट तपासनीस (टीसी) म्हणून नोकरी देतो, असे सांगत एका टोळीने मुंबईसह देशभरातील सुमारे 25 तरुण-तरुणींना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजेशकुमार, मनीष सिंग, संजीव राय आणि सीमा पवार या चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

ऐरोलीत राहणारा एक तरुण कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात होता. त्याने रेल्वेत नोकरीसाठी अर्जही केला होता. दरम्यान, त्याची ओळख राजेशकुमार, मनीष सिंग, संजीव राय आणि सीमा पवार यांच्याशी झाली. सात लाख रुपये दिल्यास रेल्वेत टीसी म्हणून नोकरी देतो, असे आश्‍वासन या चौकडीने दिले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तक्रारदाराने त्यांना पैसेही दिले. त्याच्याप्रमाणेच आणखी सुमारे 24 जणांचीही या चौघांनी अशा पद्धतीने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. 

रेल्वेच्या नावाने बनावट संकेतस्थळ 
या चौघांनी या तरुणांना पोस्टाद्वारे रेल्वेचे नियुक्तीपत्र, पहिल्या नियुक्तीचे ठिकाणाचे पत्र, पगाराचा तपशील आणि ओळखपत्र पाठवले. त्यांचा विश्‍वास बसावा यासाठी या चौघांनी रेल्वेच्या नावाने बनावट संकेतस्थळही सुरू केले होते. त्यावर संबंधित निकाल जारी करण्यात आले; मात्र एका तरुणाने काही त्रुटींबाबत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील कार्यालयात संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे कक्ष-11पथक अधिक तपास करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com